‘एचआयव्ही’बाबत संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर

योगीराज प्रभुणे  – सकाळ वृत्तसेवा
पुणे –  à¤ªà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सिद्धार्थ शहा या विद्यार्थ्याने केलेल्या “एचआयव्ही’च्या रुग्णांना झालेला अतिसार’ यावरील संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय परिषदेला हजेरी लावणारा हा देशातील पहिलाच विद्यार्थी ठरला. विशेषत: “एचआयव्ही’मध्ये संशोधन करून संबंधित रुग्णांसाठी काम करण्याचे त्याचे उद्दिष्ट असल्याचे त्याने “सकाळ’शी बोलताना सांगितले.

Source : Sakal (सकाळ)

योगीराज प्रभुणे  – सकाळ वृत्तसेवा
पुणे –  à¤ªà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सिद्धार्थ शहा या विद्यार्थ्याने केलेल्या “एचआयव्ही’च्या रुग्णांना झालेला अतिसार’ यावरील संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय परिषदेला हजेरी लावणारा हा देशातील पहिलाच विद्यार्थी ठरला. विशेषत: “एचआयव्ही’मध्ये संशोधन करून संबंधित रुग्णांसाठी काम करण्याचे त्याचे उद्दिष्ट असल्याचे त्याने “सकाळ’शी बोलताना सांगितले.

इतर देशांच्या तुलनेत भारतात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचे प्रमाण फारच कमी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्याची सुरवात विद्यार्थिदशेपासून केली पाहिजे. त्यासाठी “भारतीय वैद्यक संशोधन परिषदे’ने (आयसीएमआर) वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या देशातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून विशेष योजना सुरू केली. त्याअंतर्गत देशभरातून 700 संशोधन प्रकल्प “आयसीएमआर’ला सादर करण्यात आले होते. त्यात सिद्धार्थने “एचआयव्ही’वरील संशोधन प्रकल्प सादर केला होता. गुणवत्ता आणि दर्जानुसार “आयसीएमआर’ने प्रकल्प व्हिएन्ना येथील परिषदेसाठी पाठविला होता. त्यात हा प्रकल्प स्वीकारण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतातील पहिला विद्यार्थी म्हणून संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करण्याची संधी सिद्धार्थला मिळाली, अशी माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण जामकर यांनी दिली.

सध्या “एमबीबीएस’च्या तिसऱ्या वर्षाला असलेला सिद्धार्थ म्हणाला, ‘या प्रकल्पासाठी माझे शिक्षक आणि वरिष्ठ यांचे मोठे सहकार्य मिळाले. वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्याची इच्छा आहे. त्यातही विशेषतः “एचआयव्ही’मध्ये पुढे संशोधन करून रुग्णांसाठी त्याचा उपयोग करायचा आहे.”

मे महिन्यात हा संशोधन प्रकल्प “आयसीएमआर’ला सादर केला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय परिषदेकडे पाठविण्यात आला. त्यात निवड झाल्यानंतर 19 ते 23 जुलैदरम्यान या परिषदेला उपस्थित होतो, असे त्याने सांगितले.  

काय केले संशोधन?
“एचआयव्ही’च्या रुग्णांमध्ये कोणत्या जंतूंमुळे अतिसार होतो.

कसे केले संशोधन?
अतिसार झालेल्या ससून रुग्णालयात दाखल झालेल्या 45 “एचआयव्ही’च्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या रक्तातील नमुन्यांचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागात विश्‍लेषण करण्यात आले.

संशोधनातून काय पुढे आले?
अतिसार झालेल्या “एचआयव्ही’ रुग्णांना क्रिप्टोस्कोरिडयम, आयसोस्कोरा आणि ई. कोली हे तीन जंतू आढळले. काही मोजक्‍या रुग्णांमध्ये या तीन जंतूंसह इतर सात ते आठ जंतू सापडले. त्यामुळे “एचआयव्ही’च्या रुग्णांना या तीनपैकी एका जंतूमुळे अतिसार होत असल्याचे स्पष्ट होते.

संशोधनाचा काय फायदा?
अतिसाराचे निश्‍चित कारण शोधण्यासाठी रक्तातील नमुन्यांचे विश्‍लेषण करावे लागते. त्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो. पुण्यातील “एचआयव्ही’च्या रुग्णांना या तीनपैकी एका जंतूमुळे अतिसार होत असल्याने रुग्णावर तातडीने उपचार सुरू करता येतो. त्यामुळे उपचारातील वेळ वाचतो.Comments are closed.